लोहारा येथील सौर उर्जेचे पथदिवे कायमस्वरूपी बंद

0

लोहारा। गावाच्या हितासाठी सौर ऊर्जेची पथदिवे प्राप्त करण्यात आली आहे पण ही हजारो रुपयांची पथदिवे देखभालीअभावी बिनकामाची झ्हाली आहेत गावात विजेची बचत त्याचबरोबर समस्या निर्माण झाली की या पथदिव्यांचा वापर व्हावा यासाठी प्राप्त माहितीनुसार बसस्थानक, भिल्ल वस्थी, लेंडी नाला, आंबेडकर चौक , मातंग समाज गल्ली, या ठिकाणी हे पथदिवे बसविण्यात आले आहे. यातील एकच कार्यन्वित आहे, आता सकाळ सत्रात आणि सायंकाळ अशा दोन सत्रात भारनियमन सुरु आहे.

यातही अपडाऊन सुरु झ्हाली असतांना या यंत्रणेची गरज भासू लागली आहे त्यात चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे या अंधाराचा फायदा चोरटे घेऊ शकता तरी ही स्वयंचलीत पथदिव्यांची त्वरित दुरुस्थिती गावहितासाठी होणे गरजेचे आहे अन्यथा हि लाखो रुपयांची सौर ऊर्जाची पथदिवे हि शोभेच्या वस्तू प्रमाणे होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे.