लोहारा-कुर्‍हाड गटात भाजपाच्या उमेदवारांची प्रचारार्थ रॅली

0

वरखेडी । लोहरा-कुर्‍हाड जि.प. व पं.स.च्या गटातील अर्चना संजय पाटील व दोन्ही गण अनिता कैलास चौधरी, कुर्‍हाड गणातील संतोष भिका चौधरी यांच्या प्रचाराची रॉली भोकरी, वरखेडी, सार्वे-जमणे, कुर्‍हाड खु ॥, कुर्‍हाड बु॥, रामेश्वर तांडा, कुर्‍हाड तांडा, म्ह्सास, लोहरा, कळमसरा या गावांमधून प्रचार रॉली करून केंद्रशासन राज्य शासन जि.प.च्या माध्यमातून केलेल्या विकास कामाची माहिती देत हे सरकार गोर गरीब शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी समर्पित असून त्यांचे जीवनमान उंचावन्यासाठी प्रत्यनशील असून गटा व गणात चौफेर विकासाची कामे आणण्यासाठी व स्मार्ट व्हिलेज हि योजना राबविण्याचा मानस शासनाचा आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार ने केलेल्या विकास कामांची गावेगावी जाऊन मतदारांना जागृत करावे असे खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगितिले व गावोगावी जाऊन लोकांच्या आडीआडचणी जाणून घेतल्या.

प्रचार रॅलीच यांची होती उपस्थिती

या प्रचार रॉलीत जि.प. उमेदवार अर्चना संजय पाटील, लोहरा गणाचे उमेदवार अनिता कैलास चौधरी, कुर्‍हाड गणाचे उमेदवार संतोष चौधरी, जि.प.सदस्य शांताराम पाटील, संजय पाटील सरपंच सार्वे, वासुदेव घोगळे सरचिटणीस भाजप जामनेर, पहूर सरपंच लक्ष्मण गोरेमाजी, कैलास चौधरी, डॉ.बाळू जैन, विलास पाटील, शरद सोनार, चंद्रकात पाटील, सतीश राजपूत, उस्मान आमिर शेख, रवी महाराज, डॉ.जीतेद्र चौधरी, वरखेडी ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील, गजानन पाटील, भोकरी ग्रा.पं. सदस्य बाबू अब्दुल काकर, किरण पाटील, अजय पाटील, संजय पाटील, दत्तू राठोर, गजानन खाटिक, सोनू शाहा, दीपक खरे, डॉ.कोयुर चौधरी, नितीन राजपूत, गुलाब राजपूत, पिंटू राजपुत, राजू भदाणे, विकास देशमुख, शरद कोळी, मोहन भोई, सुनील देशमुख, सागर भोई, सुरेश जाधव, बाळू गुजर, रामधन शिंदे, गंगाराम भिल, सतोष पहेलवान, मुकेश पहेलवान, बापू पाटील, डॉ. विकास पाटील, बंटी देवरे, बापूजी पाटील, मनोज शिंपी, जगदीश तेली, मलारी माळी, सुभाष माळी, समाधान चौधरी, डॉ. प्रदीप महाजन, सुलतान रज्जाक कुरेशी, रफिक शब्बीर काकर ,फिरोज बाबू काकर ,शफी रुस्तम काकर, अनिल एकनाथ गायकवाड, हर्षल पांडे, विश्राम देवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रचार रॉली बरोबरच लोहरा-कुर्‍हाड गटात भाजपाच्या उमेदवारी प्रचारात आघाडी घेतली आहे.