लोणी फाट्याजवळ दुचाकी घसरून दोघे गंभीर जखमी

0

जळगाव । चोपड्याजवळील लोणी फाट्याजवळ दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकी घसरून दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातच दोघांना सायंकाळी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.

अण्णाजी जयराम चव्हाण (वय-40रा.वडेल ता. मालेगाव) व गोकुळ आधार पारधी (वय-30 रा.बळसोन ता. साक्री जि. धुळे) हे दोघं दुचाकीने धानोर्‍याकडून अडावदकडे जात होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकीच अचानक घसरल्याने अण्णाजी यांना डोळ्याला तर गोकुळ यांना डोक्याला जबर मार बसून गंभीर जमखी झाले. त्यांना दूपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांनी उपचारार्थ दाखल केले. यानंतर सायंकाळी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.

टॉवर चौकात रिक्षाची दुचाकीला धडक
जळगाव। टॉवर चौकात मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रिक्षाने मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल बस्त्यासाठी आलेल्या मंडळीवर जाऊन पडली. त्यात मोटारसायकलस्वारासह तिघे जखमी झाले आहे. या प्रकरणी कोणीही तक्रार न दिल्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील अनिल विठ्ठल सोळुंके (वय 52) हे कामानिमित्ताने त्यांच्या मोटारसायकलने (क्र. एमएच-19-122) शहरात आले होते. टॉवर चौकातून जुन्या बसस्थानकाकडे जात असताना समोरून येणार्‍या मालवाहू रिक्षाची (क्र. एमएच-19-जे-9106) सोळुंके यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकल बाजुला बेल्टच्या दुकानांजवळ बस्त्यासाठी आलेल्या मंडळीच्या अंगावर जाऊन पडली. त्यात सोळुंके स्वत: तसेच बस्त्यासाठी आलेली एक महिला आणि फुले मार्केटमधील दुकानात काम करणारा एक तरूण असे तिघेजण जखमी झाले.