लोणावळा परिसरात धुक्याची चादर

0

लोणावळा : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असताना गुरुवारी लोणावळा व मावळ परिसरात भल्या पहाटेपासून धुक्याचे काहूर पसरले आहे. त्यामुळे अवघ्या काही अंतरावरचे दिसणे मुश्किल झाले होते.

लोणावळा आणि मावळ परिसरात पडलेल्या धुक्यामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला होता. धुक्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळच्या प्रहारी शाळेत जाणारी मुलं व स्कूल व्हॅन, दुधवाले, कामगार व वाहनचालक या धुक्यातून मार्ग काढत प्रवास करत होते.