लोणवाडीत विवाहितेचा विनयभंग

0

बोदवड : तालुक्यातील लोणवाडी येथे शेताकडे निघालेल्या विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी 11.30 वाजता घडली. या प्रकरणी बोदवड पोलिस स्थानकात आरोपी अजय सुपडू परदेशी (लोणवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत विवाहिता शेताकडे निघाली असताना आरोपीने तिचा पाठलाग करीत तिचा रस्ता अडवून अश्‍लील वर्तन केले. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.

Copy