लोकशाही दिनी 87 अर्ज प्राप्त

0

जळगाव । दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी एकूण 87 जणांनी आपले तक्रारी अर्ज दाखल केले. विभागनिहाय प्राप्त अर्जांची संख्या याप्रमाणे महसूल 27, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 28, पोलीस अधिक्षक 7, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 12, अधिक्षक भूमि अभिलेख 3, जिल्हा कृषि अधिकारी 2, उप वनसंरक्षक 1, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, जिल्हा कोषागार अधिकारी 1, जिल्हा अग्रणी बँक (सेट्रल बँक ऑफ इंडिया) 2, मुख्याधिकारी भडगाव 1, अधिक्षक अभियंता म.रा.वि.म. जळगाव 1, सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन जळगाव 1, उपायुक्त मत्स्य व्यवसाय जळगाव 1, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 1, असे एकूण 87 अर्ज प्राप्त झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कुटे, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.