शहादा । शेतात कांद्याच्या पिकांला पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्याचा खून करण्यात आल्याची घटना शहादा तालुक्यातील लोंढरे गावात घडली. भरत पाटील (35) 22 फेब्रुवारीरोजी रात्री शेतात गेला होता. मात्र, सकाळी घरी परत न आल्याने कुंटुंबियांची शोध घेतल्यावर आई व शांतीलाल रोकडे यांना तो खाटेवर मृतावस्थेत त्यांना आढळला. अज्ञात व्यक्तींनी भरतच्या डोक्यावर घाव घालून ठार मारले असावे, असा अंदाज आहे.