लॉजमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटक्याने सेल्समनचा मृत्यू : भुसावळातील घटना

Meerut salesman dies of heart attack in Bhusawal भुसावळ : उत्तरप्रदेशातील मेरठमधील रहिवासी असलेल्या सेल्समनचा भुसावळात हृदयविकाराने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राजेश कुमार राघव (26, जाग्रती विहार, गड रोड, मेरठ, उत्तप्रदेश) असे मयताचे नाव आहे.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
राजेश कुमार राघव हे मेरठमधील लगन लेबल या कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीस होते व गेल्या दहा दिवसांपासून कंपनीच्या कामानिमित्त ते भुसावळातच हॉटेल शालिमारमध्ये मुक्कामी होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता हॉटेल कामगाराने रुमचा दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडल्याने राघव बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत राघव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परीवार आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.