लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत?: सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तयारी

0

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संख्येत रोज वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पुन्हा 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढविण्याच्या दृष्टीने सहमती दर्शवली आहे.

कालच पंजाब राज्याने पंजाबमध्ये 1 मेंपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.

Copy