लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायीकांची उपासमार : दुकाने उघडण्याबाबत प्रशासनाला निवेदन

0

मुक्ताईनगर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे तर गेल्या दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत आहे. यामुळे सलून व्यावसायीकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याने सलुनची दुकाने पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन गुरुवार, 21 रोजी मुक्ताईनगर शहरातील नाभिक (न्हावी) समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले.

तहसीलदारांशी चर्चा करून दिली परवानगी
आमदार पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी याबाबत चर्चा करून तुर्तास शासनाच्या गाईडलाईननुसार सलुनची दुकाने सुरू करण्याची परवानगी तहसीलदारांनी चर्चेअंती दिली. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत सॉनिटायझर व मास्क या सारख्या कोरोना संसर्गापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना सलूनच्या दुकानांमध्ये अवलंबविण्यात याव्यात अश्या सूचनाही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदारांनी सलून व्यावसायीकांना केल्या.

Copy