लॉकडाऊनमध्ये ‘या’ गोष्टींना आहे सुट

0

जळगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात बंदी आदेश जारी केले आहेत. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणार्‍या दुकाने आणि आस्थापनांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

बंदी आदेशातून सूट

१) किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, खाद्य पदार्थ, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
२) औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
३) बँका/एटीएम, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या
४) टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा
५) किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये
६) मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
७) अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
८) उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
९) औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, चारा निर्मिती घटक इत्यादी
१०) रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
११) पेट्रोल पंप (निर्धारीत वेळेत), एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज, त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
१२) टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या सेवा
१३) अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणार्‍या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणार्‍या संस्था