लॉकडाऊनचा जिल्हा दूध संघाला फटका

0

एक दिवस दूध संकलन बंद

जळगाव- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनचा फटका जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघालाही बसला आहे. मागणी नसल्याने आज सोमवारी जिल्हा दूध संघाने दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून संकलन पूर्ववत केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी “दैनिक जनशक्ती” शी बोलताना दिली.


देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सर्वच घटकांना लॉकडाउनमुळे फटका बसला आहे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघालाही हा फटका सहन करावा लागत आहे. जिल्हा दूध संघाकडे सद्यस्थितीला साडेतीन लाख लिटर दूध संकलन होत असून त्यापैकी एक लाख लिटर पाऊच आणि एक लाख लिटर पावडर असे केवळ दोन लाख लिटर विक्री होत आहे. तब्बल दीड लाख लिटर लिटरचा फटका दूध संघाला बसत आहे. त्यामुळे आज सोमवारी दूध संघाने फक्त संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून संकलन पूर्ववत संकलन आणि विक्री पूर्ववत होणार असल्याचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी सांगितले.

मुंबईहून मागणी घटली
मुंबई येथून जिल्हा दूध संघाकडे दररोज पंधरा ते वीस हजार लिटर ची मागणी होत असते. मात्र लॉकडाउनमुळे ही मागणी घटली असून आता केवळ पाच हजार लिटर दुधाची मागणी होत आहे. महानंदा डेअरीकडूनही दोन दिवस संकलन बंद राहिल्याने त्याचा देखील फटका जिल्हा दूध संघाला सहन करावा लागला आहे.

Copy