लॉकडाउन : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्व राज्यांचे कौतुक

0

नवी दिल्ली – लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला आहे. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव होत असताना काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीदरम्यान नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे तिथे योग्य ती काळजी घ्यावी असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.