लेवा पाटीदार महासंघातर्फे विवाहापुर्व समुपदेशन कार्यशाळा

0

भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागातर्फे विवाहेच्छुक युवक, युवती व पालकांसाठी योग्य जोडीदार निवडतांना विवाहापुर्व समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन कुटुंबनायक रमेश पाटील यांच्याहस्ते गणेश पुजनाने करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी जीवन प्रशिक्षक व समुपदेशक डॉ. प्रशांत फालक यांनी योग्य जोडीदार निवडतांना कोणती काळजी घ्यायला हवी व जोडीदार निवडतांना कोणत्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. नंतर उपस्थित पालक व युवक, युवतींमध्ये चर्चा सत्र पार पडले. त्यानंतर काही प्रश्‍नोत्तरे व शंका, समाधान निरसन करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, शाम भारंबे, उमेश फेगडे, दिपक धांडे, रुपेश चौधरी, मनिष पाचपांडे, गिरीश चौधरी, कल्पेश पाटील, राहुल नेमाडे, कोमल चौधरी आदी उपस्थित होते.