लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित व्याख्यानमालेचे आयोजन

0

जळगाव- लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या शंभरीनिमित्त शताब्दी वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने १५, १६ तसेच १७ ऑक्टोंबर रोजी तीन दिवससीय व्याख्यानमाला शहरातील लेवा बोर्डींग येथे आयोजित करण्यात आले यात पत्रकार, साहित्यिक तसेच संगीतकार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली़

माणसांचे मुलभूत परिवर्तन विचारांनी होते़ या वैचारिक वारसा दुसºया पिढ्यांपर्यंत संक्रमित करायचा असेल तर शैक्षणिक वातावरणात विचारांची कास धरणारी माणसे जपली पाहिजे़ त्यामुळे व्याख्यानातून नागरिकांना व्यासपीठाची संधी मिळते, हा प्रपंच समोर ठेवून व्याख्यानमाला आयोजित केली आहे़ दरम्यान, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी १५ ऑक्टोंबर रोजी पुणे येथील पत्रकार संजय आवटे हे ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमांना हजेरी असणार असल्याचेही डॉ.चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर दुसºया दिवशी १६ ऑक्टोंबरला बहुजन हिताय, बहजुन सुखाय या विषयावर कोर्ट व किल्ला चित्रपटाचे संगीतकार संभाजी भगत हे मार्गदर्शन करणार आहे. तिसऱ्या दिवशी १७ ऑक्टोंबरला बहिणाबाईची गाणी : माझं मुळ, माझं कुळ या विषयावर परभणी येथील साहित्यिक प्रा.इंद्रजित भालेराव हे आपले विचार मांडणार आहेत.

Copy