लाहोरमध्ये स्फोटात 6 ठार, 16 जखमी

0

लाहोर : पाकिस्तानी लष्कराचे एक पथक गस्त घालत असताना आत्मघातकी दहशतवाद्याने केलेल्या स्फोटात चार पाकिस्तानी सैनिक व दोन नागरिक ठार झाले. तर 18 जण जखमी झाले. लहोरमधील पंजाब प्रांतातील लष्करी भागात हा स्फोट झाला.

जखमींना लाहोरमधील लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात दोन व्हॅन व एक मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. एक तरूण लष्करी वाहनांच्या अगदी जवळ आला आणि त्याने स्वत:ला बॉम्बस्फोट करून उडवून दिले, असे एका प्रत्यक्षदर्शीने स्थानिक माध्यमांना सांगितले.