लास पाल्मस विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी

0

माद्रिद : सेव्हिलाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत लास पाल्म्स क्लबची १५ सामन्यांची अपराजित मालिका कायम राखली. यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यावरील दबाव कायम राखला. गुणतालिकेत माद्रिद (४९ गुण) आणि बार्सिलोना (४८) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असून सेव्हिलाने (४६) विजयासह तिसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. बदली खेळाडू जोकिम कोरेयाने ८०व्या मिनिटाला सेव्हिलासाठी विजय गोल केला.

पाचव्या मिनिटाला व्हिगोला आघाडी
दुसऱ्या लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदने अखेरच्या चार मिनिटांत दोन गोल करीत सेल्टा व्हिगोविरुद्ध ३-२ असा निसटता विजय मिळवला. गुस्ताव्हो कॅब्रेलने पाचव्या मिनिटाला पाहुण्या व्हिगोला आघाडी मिळवून दिली. मात्र, फर्नाडो टोरेसने ११व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून माद्रिदला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ७८व्या मिनिटाला जॉन गाईडेट्टीने व्हिगोला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरच्या पाच मिनिटांपर्यंत ही आघाडी कायम राखीत व्हिगोने विजयाच्या दिशेने कूच केली होती, परंतु यॅनिक कॅरॅस्कोची अप्रतिम व्हॉली (८६ मि.) आणि अँटोइने ग्रिएझमन (८८ मि.) निर्णायक गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिकोने विजय खेचून आणला. व्हिलारिअल यांची अडथळ्यांची शर्यत संपता संपत नाही. सोमवारी घरच्या मैदानावर त्यांना मलगा क्लबने १-१ असे बरोबरीत रोखले.