लासलगाव येथे ग्रिडर उभारणीनिमित्त दोन दिवस काही गाड्यांना विलंब

0

भुसावळ : भुसावळ इगतपुरी विभागादरम्यान लासलगाव येथे ग्रिडर उभारणी निमित्त 11 जानेवारी रोजी गाडी क्रमांक 15018 काशी एक्सप्रेस दुपारी 1.30 ते 2 वाजे दरम्यान अन्य स्थानकावर थांबविण्यात येईल. तर 12 रोजी ही गाडी दुपारी 1.30 ते 3.50 पर्यंत अन्य रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येईल.

गाडी क्रमांक 15646 गुवाहाटी- मुंबई एक्सप्रेस मनमाड स्थानकावर 1 तास 10 मिनीटे थांबविण्यात येईल. गाडी क्रमांक 12533 पुष्पक एक्सप्रेस पानेवाडी स्थानकावर 1 तास 5 मिनीटे थांबविण्यात येईल. गाडी क्रमांक 12860 गीतांजली – एक्सप्रेस हिसव्हाल स्थानकावर 10 मिनीटे थांबेल, गाडी क्रमांक 51424 मनमाड – इगतपुरी शटल 2 तास 35 मिनीटे उशिराने धावेल, गाडी क्रमांक 11055 गोदान एक्सप्रेस निफाड रेल्वे स्थानकावर 40 मिनीटे थांबेल, गाडी क्रमांक 12542 संतकबीरधाम एक्सप्रेस कसबेसुकने स्थानकावर 35 मिनीटे थांबेल. गाडी क्रमांक 12869 मुंबई हावडा साप्ताहिक गाडी खेरवाडी स्थानकावर 25 मिनीटे थांबेल तसेच अप-डाऊन मालगाडी वाहतुक प्रभावीत होणार आहे.