लासगावातील हातमजुर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

A young manual laborer in Lasgaon committed suicide by hanging himself पाचोरा : आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील लासगाव येथील 28 वर्षीय हातमजुराने राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गौतम विरभान लोखंडे (28, लासगाव, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

आर्थिक विवंचनेत टोकाचे पाऊल
गौतम लोखंडे या हातमजुराने मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आर्थिक विवंचनेतून गळफास घेतला. तरुणाची पत्नी जळगंव येथे माहेरी, आई व वडिल हातमजुरीला गेलेले असतांना तरुणाने आत्महत्या केली. मृतदेहाचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. गौतम लोखंडे यांच्या पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.