लालमाती आश्रमशाळेतील विद्यार्थी करताहेत ‘स्टडी फ्रॉम होम’

0

रावेर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल येथील प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांच्या प्रेरणेतून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती, ता.रावेर येथील शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व पालक यांचे वर्गनिहाय नऊ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ दिला जात असून सुरुवातीला विद्यार्थांना अभ्यास करतांना त्रास होऊ नये म्हणून शुद्धलेखन, गणितीय सूत्रे, गाणी, गोष्टी, आकृत्या काढणे, स्पेलिंग्ज या सारखा अभ्यास देण्यात आला. विविध शिक्षकांच्या शिकवणीचे व्हिडीओ व अभ्यासक्रमांच्या लिंक्स विद्यार्थ्यांना पाठविल्या जात आहेत. कोरोना या विषाणूजन्य संसर्गापासून कसा बचाव करावा या विषयीची माहिती तसेच आरोग्यविषयक बाबी इत्यादीचे लेख पालकांना पाठविले जात आहेत सोबतच सिकलसेल सकारात्मक विद्यार्थ्यांची सुद्धा आरोग्यविषयक चौकशी करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे स्टडी फ्रॉम होम
काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते इतर पालकांची मदत घेऊन या उपक्रमात सहभागी होत आहेत. ादिवासी विभागाच्या शाळा बंद पण शिक्षण नाही या उपक्रमाला प्रतिसाद देत शिक्षक विद्यार्थांना अभ्यासाचा आनंद स्टडी फ्रॉम होम च्या माध्यमातून मिळवून देत आहेत तसेच लालमाती येथील विद्यार्थ्यांची अटल आरोग्य वाहिनी ( अ‍ॅम्ब्युलन्स) च्या माध्यमातून घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करून आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Copy