Private Advt

लातूर मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्र्यांकडून १०० कोटींची घोषणा

0

लातूर-मराठवाड्यातील लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच शासकीय रुग्णालयाच्या विस्तारासाठी जमीनही देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आज लातूर येथे अटल महाआरोग्य शिबिरात बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.