लाच मागणे भोवले : मारवडचा पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात

1

पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी मागितली 500 रुपयांची लाच

अमळनेर- तालुक्यातील मारवड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संजय रमेश बोरसे (42, रा.शास्त्री नगर, कृषी कॉलनी जवळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने 500 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी दुपारी अटक केली. 35 वर्षीय तक्रारदाराचे मारवड पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट व्हेरीफिकेशन प्रकरण आल्यानंतर आरोपी बोरसे यांनी 500 रुपये लाचेची मागणी 5 सप्टेंबर रोजी केली होती. तक्रारदाराने या बाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती तर लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने शनिवार, 29 रोजी आरोपीविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी केली.

Copy