लाच भोवली : पिंपळे तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात

Pimple Talathi Dhule in the net of ACB while accepting a bribe of eight hundred rupees धुळे : शिरपूर तालुक्यातील पिंपळे येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे (रा. प्लॉट न 5,वासुदेव बाबा नगर, वासुदेव बाबा मंदिराजवळ, शिरपूर) यास आठशे रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. होळ येथील ग्रामसचिवालयात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

लाच घेताना केली अटक
तक्रारदार यांचे सात बारा उतार्‍यावर नाव बदलून देण्याकरीता आरोपी ज्ञानेश्वर बोरसे यांनी तक्रारदाराकडे आठशे रुपयांची लाच मंगळवारी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. ग्रामसचिवालय होळ येथील तलाठी कार्यालयात आरोपीने लाच स्वीकारताच आरोपी ज्ञानेश्वर बोरसे यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.