लाच भोवली ; चाळीसगाव शहरचे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

0

जळगाव: गांजाची तस्करी करतांना गुन्हेगार मिळुन आल्यानंतर त्याला पैशाच्या आमिषापोटी सोडून दिले यानंतर त्याच गुन्हेगारांवर केस न करण्यासाठी ८ हजारंची लाच घेणाऱ्या चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या सहायक फौजदार बापूराव फकीरा भोसले तसेच पोलीस कान्स्टेबल गोपाळ गोरख बेलदार या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी गुरुवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.

काय आहे प्रकरण
एक तरुण गांजाची तस्करी करतांना मिळुन आला होता. बापुराव भोसले व गोपाळ बेलदार या दोघांनी संशयित तरुणाला कारवाई न करता सोडुन दिले. तसेच त्याला केस करण्यासाठी दहा हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार रुपये एवढी रक्कम ठरली. याबाबत तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपतच्या पथकाने २३ मे रोजी आठ हजारांची लाच घेतांना भोसले व बेलदार या दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लॉकडाऊन अन् पदाचा दुरुपयोग करत लाचखोरीचे अशोभनीय वर्तन

लॉकडाऊन सुरु असतांना बापुराव भोसले व गोपाळ बेलदार या कर्मचार्‍यांनी लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन व लाचखोरी वृत्तीचे अशोभनीय असे वर्तन केले. या कृतीमुळे पोलीस खात्याची बदनामी करणारे व शिस्तीत बाधा , कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भारतीय संविधान अनुच्छेद ३११ (2) (ब) अन्वये सहायक फौजदार बापूराव भोसले, गोपाळ बेलदार या दोघां कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले.

Copy