Private Advt

लाच भोवली : चाळीसगावातील कंत्राटी डॉक्टर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : चाळीसगावातील 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (घाट रोड, चौधरीवाडा, चाळीसगाव) यांना 60 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉ.सैय्यद यांच्या खाजगी क्लिनीकमध्ये लाच स्वीकारताना सोमवार, 27 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

खाजगी रुग्णालयात स्वीकारली लाच
चाळीसगावातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) आहे. कोरोना काळात कोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड्यातून तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांच्या सेवेच्या मोबदल्यात शासनाकडून बिल मिळणार असून या बिलांची पडताळणी करून त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव यांचे सही-शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव यांच्याकडून पडताळणी करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी डॉ.मुश्ताक मोतेबार सैय्यद यांनी सोमवारी लाच मागितली होती. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.