लाखो रुपयांचा तांदूळ पकडला

0

धुळे । गोर-गरिबांच्या तोंडचा घास हिरावून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने बुधवारी रात्री काळाबाजारात जाणारा रेशनचा लाखो रुपयांचा तांदुळ पकडल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथून रेशनचा ट्रकभर तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी धुळे मार्गे जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारावर एलसीबीचे पीआय देविदास शेळके यांनी मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसीडेन्सी जवळ सापळा रचला बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रेशनमालाची ब्लॅक मार्केटिंग करणारे पोलिसांच्या सापळ्यात अडकले.

पुरवठा विभागाच्या मदतीने गुन्हा नोंदविला

पोलिसांनी रात्री एम. एच. काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 18 एम. 8960 क्रमांकाचा ट्रक थांबविला. ट्रकमधील मालाबाबत आणि मालाच्या बिलाच्या पावत्याबाबत विचारणा केल्यानंतर चालकाने चुप्पी साधली. त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला. मिळालेली गुप्त माहिती खरी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रकमधील मालाची तपासणी केली. ट्रकमध्ये लाखो रुपये किंमतीचा रेशन माल असल्याचे उघड झाले आहे. रेशनचा माल असल्याने पुरवठा विभागाच्या मदतीने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया केली गेली. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे नेमका किती मालाचा काळाबाजार करण्यात येत होता. जिल्हा पोलिस प्रमुख एस. चैतन्या, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय देवीदास शेळके, हे.कॉ.जितेंद्र आखाडे, कापुरे, संदीप थोरात, आरीफ शेख, सचिन गौंसाळे, अमित रणमळे, विजय सोनवणे, चेतन कंखरे, नितीन मोहने, गौतम सपकाळे आदींनी ही कारवाई केली.

या धांदलीचा सुत्रधार कोण?

जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊन देखील यामागचा मुखिया कोण आहे हे समजू शकलेले नाही. रेशनचे ब्लॅक मार्केटिंग करणारे सुत्रधार कोण? हा सवाल अद्यापही अनुत्तरीत आहे. महसूल जिल्हाअधिकार्‍याच्या आधिकारातील सरकारी विभाग आहे. नागरिकांची रेशन दुकान मालक तसेच रेशन माफिया पासून फसवणूक होते पुरवठा विभागातील यंत्रणा देखील डिजिटल होणे आवश्यक आहे. जेणेकरून रेशन माफियांच्या हालचाली वर लक्ष प्रशासनाचे राहणार आहे.