लाखाणी पार्क येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन

0

नवापूर । नवापूर शहरातील लाखाणी पार्क येथील गुजराथी प्राथमिक विद्यालय तथा माध्यमिक विद्यालयात डिजिटल शाळेचे उद्घाटन नंदुरबार येथील प्राथमिक उपशिक्षण अधिकारी डॉ. राहुल चौधरी यांचा हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपशिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण संस्थेचे सचिव परवेज लखानी फेजल लाखानी, सैय्यद इसरार अली, मुख्याध्यापक हरीष बोरसे, उपमुख्याध्यापक जुबेर पठाण, अमन मोरे आदी उपस्थित होते.

सकारात्मक व अभिमानाची बाब
यावेळी उपशिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले की विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांना घडविणे हे शिक्षकांचे काम असते. आज या शाळेचे डिजिटल शाळेते रुपांतर झाले ही बाब सकारात्मक व अभिमानाची आहे. शिक्षणामध्ये असे काम करा की पूर्ण जग तुम्हाला सलाम करेल. शिक्षण घेतांना आपली एकाग्रता चांगली ठेवा डिजिटल शाळेचा उपयोग विद्यार्थाचा सर्वागिण विकासासाठी करुन विद्यार्थासोबत शिक्षकांनी डिजीटल व्हावे प्रगत जलद शिक्षणासाठी प्रयत्न करणे सर्वांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री गारोळे यांनी केले तर आभार जुबेर सैय्यद यांनी मानले.