लांडग्यांनी 30 मेंढ्या मारल्या

0

धुळे । जिल्ह्यातील टिकर -मोघन गावात लांडग्यांच्या हल्ल्यात तब्बल तीस मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना रवीवारी रात्रीच्या सुमारास घडली. शेताच्या बांधावर बांधलेल्या मेंढ्यापैकी आठ ते दहा मेंढ्यांना लांडगे घेऊन गेल्याचे मेंढपाळांनी सांगितले. दरम्यान नुकसान भरपाईच्या कार्यवाहीसाठी येथील तलाठ्यांनी मेलेल्या मेंढ्यांचा पंचनामा केला असता लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचे मेंढपाळांनी सांगितले.

पशुपालकांमध्ये दहशत
मोघन गावातील भिकन माळी यांच्या शेताच्या बांधावर हे मेढंपाळ राहात होते. या भागात लांडग्यांचे वास्तव्य आहे परंतु स्वत:च्या पोटापाण्यासाठी व जनावरांना चारण्यासाठी या ठिकाणी मेंढपाळ मेंढ्या राखतात. रविवारी रात्री अचानक काही लांढग्यांच्या कळपाने मेंढ्यांवर हल्ला केला. त्यात तीस मेंढ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या े दहा मेंढ्यांना घेऊन लांडगे पसार झाले. या मेंढ्या एकनाथ महादू यांच्या मालकीच्या होत्या. या घटनेमुळे गावातील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील वन्य प्राण्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वस्त्यांकडे येणारे प्राणी आतापासून लोकांची दहशत वाढवित आहे. या प्राण्यांना शेतकर्‍यांचे पशुधन आयते शिकारीसाठी सापडत असल्याने लोकांचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी बर्‍याचदा हे प्राणी कळपांनी मानवी वस्तीकडे येत असल्याने पशू पालकांची भीती आतापासूनच वाढली आहे.