Private Advt

लहान भावाचा बहिणीने केला खून : मनमाडमधील धक्कादायक घटना

मनमाड : लहान भावाच्या पोटावर बहिणीनेच चाकूने वार केल्याने भावाचा मृत्यू झाल्याची घटना मनमाडमधीलत विवेकानंद नगर क्र.2 या भागात घडली. संदीप गोंगे (45) या भावाचा या घटनेत मृत्यू झाला तर आरोपी बहिण शोभा गारुडकर (55) हिला पोलिसांनी अटक केली.

त्रास देत असल्याने काढला काटा
भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून भावाचा खून केल्याची कबुली आरोपी महिला गारूडकर यांनी पोलिसात हजर झाल्यानंतर दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

व्यसनी भावाचा वाढला होता जाच
विवेकानंद नगर क्रमांक दोनमध्य संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहिण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करून कधी कधी मारहाण करीत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले.