लस येत नाही तोपर्यंत काळजी घ्या; अधिवेशनापूर्वी मोदींचे आवाहन

0

नवी दिल्ली: आज सोमवार १४ सप्टेंबरपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खबरदारीसह हे अधिवेशन होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“सध्या जगभर कोरोनाचे संकट आहे. जो पर्यंत औषध येत नाही, तोपर्यंत काळजी घ्या, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लवकरात लवकर लस निर्मिती व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आमचे शास्त्रज्ञही यशस्वी ठरले आहेत” असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

“संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे, असा स्पष्ट संदेश संसदेचे सर्व सदस्य देतील असा आपल्याला विश्वास आहे” असे मोदींनी सांगितले.

Copy