लसीकरणासाठी जिल्हाप्रशासन सज्ज !

३३ लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण , गरज भासल्यास अजून लसीकरण केंद्र उभारणार

जळगाव – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. केंद्र सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.ज्यात देशातील १८वर्षावरील सर्व नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधक लस घेता येंर आहे.१ मेपासून या भव्य लसीकरणाला देशभरात सुरुवात होणार आहे. ज्याची पूर्वतयारी जळगाव जिल्ह्यातही सरू झाली असून जिल्हात योग्यरितीने लसीकरण पूर्ण होईल असे जिल्हाशल्य चिकित्सक चव्हाण यांनी जनशक्ती शील बोलताना सांगितले.
याच बरोबर जिल्ह्यात या घडीला १३३ लसीकरण केंद्र आहेत ज्यात खासगी आणि सरकारी अश्या दोन केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर मोठ्या उत्साहात लसीकरण सुरु होते आणि आत्ता हि असणार आहे.मात्र गरज भासल्यास जिल्ह्यात अजून लसीकरण केंद्र देखील सुरू केले जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

केवळ दोनच प्रकार
जळगाव जिल्ह्यात नागरिकांना केवळ दोनच प्रकारच्या लशी यावेळी देण्यात येणार आहे. ज्यात कोविशिल्ड लशीचा आणि कोव्हाक्सीनचा समावेश आहे. भारतामध्ये नोंदणीकृत परवानगी देण्यात आलेल्या दुसऱ्या कोणत्याही लशी अध्यापक जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत.

अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेणे
लसीकरणाबाबत प्रसारमाध्यमातून बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत. जात मासिक पाळी आल्यावर महिलांनी लसीकरण करू देऊ नये अशा देखील अफवांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता बसिकरण करून घेणे. लसीकरण केल्याने नागरिकांना फायदाच झाला आहे. लसीकरण केल्यावर कोरूना चा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे.लसीकरण केल्याने फायदा झालाचा निष्कर्ष काढणारे असे कित्येक अहवाल आत्ता पर्यंत समोर आले आहेत.

मोफत लसीकरण उत्साहातच
जिल्हात ज्या ज्या ठिकाणी मोफद लसीकरण होत आहे त्यात्या ठिकाणी नागरिक उत्साहातच लसीकरण करून घेत आहेत. मात्र ज्या ठिकाणी लस विकत घ्यावी लागत आहे अशा ठिकाणी मात्र नागरिक निरुत्साही दिसत आहेत.