लष्करी जवान ठार

0

देहूरोड : केंद्रीय आयुध भांडार येथे सेवेत असलेल्या लष्करी जवानाचा मंगळवारी रेल्वेखाली चिरडून मृत्यु झाला. त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र लोहमार्ग पोषूसांनी अपघाताची नोंद केली आहे. एस. मारन के. (वय 44) असे मृत जवानाचे नाव आहे.

माहितीनुसार हा जवान लोहमार्गातून धावत होता. मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी यावेळी याच रूळावरून येत होती. चालकाने हॉर्न वाजवून इशारा दिला होता. मात्र अचानक जवान रूळावर पडला आणि अपघात झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Copy