लष्कराला मोठे यश: पुलवामासारख्या हल्ल्याचा कट उधळला

0

श्रीनगर: भारताला नेहमीच दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागतो. दीड वर्षांपूर्वी पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भारतीय जवान शहीद झाले होते. दरम्यान पुन्हा पुलवामासारखा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता, तो उधळण्यात भारतीय सैन्य दलाला यश आले आहे. संट्रो कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. सैन्य दलाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला आहे. 40-45किलोचे स्फोटके नष्ट करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या कटामागे हात असल्याचे समोर आले आहे.

Copy