लवकरच येणार 100 रूपयांच्या नव्या नोटा

0

नवी दिल्ली –  100 रूपयांच्या नव्या नोटा लवकरच चलणात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  केली आहे. नव्या नोटा चलणात येणार असल्या तरी जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. यापुर्वी 4 डिसेंबर रोजी 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बाजारात छोट्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. यावर उपाययोजना म्हणून आरबीआयने 20, 50 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नव्या नोटा चलनात आल्यानंतर जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, असेही म्हटले आहे.