लवकरच फडणवीस यांची मुलाखत घेणार: संजय राऊत

0

मुंबई: शिवसेना नेते खासदार सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांव्यतिरिक्त संजय राऊत इतर नेत्यांची मुलाखत घेणार का? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी मी लवकरच भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांकडे देखील अनेक विषय असतात, त्यांच्याकडील गोष्टीही जनतेपर्यंत जायला हवेत, त्यासाठी मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सरकार विरोधात विरोधक बोलतच असतात, ते बोललेही पाहिजे नाही तर सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरु होईल असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतून अनेक राजकीय मुद्द्यांचा उलगडा केला. त्यामुळे राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Copy