लवकरच पेट्रोल ठोकणार शतक; आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ

0

मुंबई- पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले आहे. आहे. पेट्रोलने आधीच नव्वदी पार केली असून लवकरच शंभरी गाठेल अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रुपये प्रति लिटर झाला असून डिेझेलचा दर 79.01 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसंच दिल्लीत पेट्रोलचा दर 83.22 वर पोहोचला असून डिझेलचा दर 74.42 रुपये झाला आहे. सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं. तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं होतं. यानंतर दोन दिवस दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा एकदा इंधनात दरवाढ झाली आहे.

नव्वद रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल लवकरच, कदाचित ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकते असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. भारतातल्या पेट्रोल व डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या आसपास आहे. या वर्षाअखेरीपर्यंत हा दर शंभर डॉलर्स पार करू शकतो असा अंदाज सिंगापूरमध्ये एशिया पॅसिफिक पेट्रोलियम कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ कंपन्यांनी या परिषदेत वर्तवलेल्या अंदाजानुसार इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचा भाव कडाडण्याची शक्यता आहे.

Copy