लवकरच अनलॉक-३: चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र गेल्या चार महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग धंदे बंद असल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु दरम्यानच्या काळात सरकारने देशात टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या माध्यमातून अनेक उद्योग-धंदे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता अनलॉक-२ सुरु असून १ ऑगस्टनंतर अनलॉक-३ सुरु होणार आहे. अनलॉक- ३ मध्ये सोशल डिस्टंसिंचे पालन करून चित्रपट गृहे सुरु होण्याची शक्यता आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ज्यात चित्रपट सुरु करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

चित्रपट गृहाच्या मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे असे सुचविले आहे.

३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-२ येत्या ३१ जुलैला संपणार आहे.