ललित कोल्हे यांना अटक

0

जळगाव: बांधकाम व्यावसायिक खुबीचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे याना बुधवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली.

सोळा जानेवारी 2020 रोजी रात्री गोरजाबाई जिमखाना येथे रात्री 08.30 वाजता व्यावसायिक खुबीचद साहित्या यांच्यावर ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सात जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल गुन्हयात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात कोल्हे हे फरार होते.

साहित्या यांची महागडी कार ललित कोल्हे यांना दिली होती. ती कार परत मागितली असता साहित्या यांच्या कडून खंडणी मागितली होती. तसेच पिस्तूलचा धाक दाखवून लाकडी दाडक्याने मारहाण करण्यात आली होती. या घटनेत साहित्या गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना मुंबई हलविण्यात आले होते.

दरम्यान ललित कोल्हे हे महाबळ परिसरात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली. त्यानुसार आज रात्री एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकाने रामानंद नगर परिसरातील श्रध्दा कॉलनीतुन कोल्हे यांना ताब्यात घेतले.

Copy