ललित कला केंद्रात उद्या विद्यार्थी मेळावा

0

चोपडा : येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या ग्रामीण भागात कलेचे शास्त्रोक्त शिक्षण देणार्‍या कलासंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘आठवण कलारंग’ माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ललित कला केंद्रात होणार्‍या मेळाव्याचे उद्घाटन माजी विधानसभाध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्राचे चित्रकला व शिल्प निरीक्षक भास्करराव तिखे व मूळचे चोपडा तालुक्यातील गरताड येथील रहिवासी असलेले मुंबई येथील जे.जे. स्कूल आफ आर्ट या कला महाविद्यालयातील प्राध्यापक तथा प्रसिद्ध चित्रकार प्रा. राजेंद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.