लग्न करायला आले अन कोरोना बाधित झाले

1

नवरदेव, नवरीसह हळद लावणारे आणि फोटोग्राफर कोरोना बाधित

एरंडोल (प्रतिनिधी) – देशात कोरोनाने थैमान घातले असून दररोज रुग्ण वाढतच आहे .कोरोनावर अजूनही औषध सापडले नाही . जगात कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न दिवस रात्र सुरु आहे मात्र अजून हि यश आलेले नाही . सध्यातरी यावर उपचार फक्त घराबाहेर निघतांना तोंडाला मास्क लावणे , दोन व्यक्तीमंध्ये कमी कमी तीन फुटाचे शाररिक अंतर ठेवणे हा एकच उपाय सध्यातरी आहे . शासन स्थरावर वेळोवेळी सोशल डिस्टन्स ठेवणे,मास्क वापरणे, गर्दी न करणे ह्या सूचना दिल्या जात आहे. इतके सांगून हि लोक ऐकायला तयार नाही याचाच परिणाम म्हूणन एरंडोल तालुक्यातील विखरण या गावात तब्ब्ल १६ लोक पॉझिटिव्ह आले आहेत.

याबाबत सविस्तर असे कि १४ जुन रोजी एरंडोल तालुक्यातील विखरण गावातील मुलाचे पारोळा येथील मुली सोबत लग्न झाले. या ठिकाणी लग्नाला कमी लोक आले होते.या ठिकाणी लग्नात आलेल्या लोकांपैकी एकूण १६ लोक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आधी नवरदेव यास लग्न झाल्यावर त्याची तब्येत खराब झाली होती तो जळगाव येथे इलाज करण्यासाठी गेला असता तिथे पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर नवरी,हळद लावणारे,फोटोग्राफर,जवळचे दोन नातेवाईक पॉझिटिव्ह आले आहेत. नवरदेव नवरी कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.दरम्यान खर्ची येथील ११ लोकांना प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी कॉरंटाइन करण्यासाठी गाडी घेऊन गेले त्यावेळेस त्या लोकांनी विरोध केला जवळपास एक तास या लोकांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली परंतु प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी त्या लोकांची समजुत घातल्यावर ते राजी झाले.यावर तरी जनतेने कृपया गर्दी करू नका,मास्क वापरा, लग्न,मयत कार्यक्रम अगदी मोजके लोक अंतर ठेवून मास्क लावून करा.या अनुभवाच्या उदाहरणातून शिका.असे भावनिक आव्हाहन एरंडोल तालुक्याचे प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी जनतेला केले आहे.

Copy