Private Advt

लग्नाहून परतल्यावर कुटूंबाला बसला धक्का

चाळीसगावातून दागिन्यांसह ७ लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील चामुंडा माता मंदीराच्या मागे राहणारे अग्रवाल कुटूंब विवाहासाठी अमरावती येथे गेले होते. लग्नसमारंभ आटोपून घरी परतल्यानंतर घरातील अस्ताव्यस्त झालेले सामान बघताच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. दागिन्यांसह तब्बल ७ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याने अग्रवाल कुटूंबाला मोठा धक्काच बसला. यासदंर्भात चाळीसगाव पोलिसात कपील अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.