Private Advt

लग्नासाठी तरूणीकडून होणारा छळ असह्य : उचंद्यातील तरुणाची आत्महत्या

मुक्ताईनगर : उचंदा येथील 25 वर्षीय तरुणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केली. लग्नासाठी तरुणीकडून वारंवार होत असलेल्या मागणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हे पाऊल उचलल्याने आल्याने या प्रकरणी संशयीत आरोपी तरुणीविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय सीताराम इंगळे (25, उचंदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

लग्नासाठी तरुणाचा मानसिक छळ
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवासी अजय सीताराम इंगळे (25) हा आपल्या परीवारासह वास्तव्यास होता. गावातीलच 28 वर्षीय तरुणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करण्यासाठी तगादा लावला मात्र अजय त्यास नकार दिला मात्र लग्नासाठी वारंवार मानसिक छळ होत असल्याने त्यास कंटाळून अजयने मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरुणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.