Private Advt

लग्नाच्या नावाखाली पावणेदोन लाखांचा गंडा : सहा जणांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : लग्न लावून देण्याच्या नावाखाली चाळीसगाव तालुक्यातील पातोंड्यातील तरुणाची एक नाख 70 हजारांचे दागिने घेऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
अमोल विश्वनाथ महाजन (30, रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 जानेवारी ते 29 जानेवारी 2022 रोजी दरम्यान सुरेखा गणेश भावणे, शकुंतला शिवाजी वंजारे (दोन्ही रा. औरंगाबाद), एजंट किरण नारायण पाटील, ज्योती राम कळसकर, शुभम प्रशांत, किर्ती शाह, सोनिया राम कळसकर (रा. औरंगाबाद) यांनी संगणमत करुन अमोल महाजन यांचा विश्वास संपादन केला तसेच लग्न लावून देण्याच्या नावावरुन लग्न लावण्यासाठी 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून फसवणुक केली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय अनिल अहिरे करीत आहेत.