लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

0

भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवून भुसावळ येथील एका शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फैजपूर येथील एका विद्यालयातील शिक्षिकेवर भुसावळमधील तरुणाने अत्याचार केल्याचा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन नारायण भंगाळे (वय 31, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ), त्याचे वडील नारायण भंगाळे, आई शोभा भंगाळे, बहीण ललिता कैलास कुरकुरे व मेहुणे कैलास कुरकुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मुख्य आरोपी चेतनने अनेकदा तरुणीवर ठिकठिकाणी अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला असून, अन्य आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल तपास करीत आहेत.