Private Advt

लग्नाच्या आमिषाने धरणगावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चोपडा : जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. धरणगाव शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास अटक करण्यात आली.

13 वर्षीय मुलीवर अत्याचार
धरणगाव शहरातील एका भागातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 17 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी ही चोपडा येथे आपल्या आई-वडिलांसह आली होती. त्यावेळी संशयीत आरोपी दीपक हिरामण पाटील (रा.संजय नगर, धरणगाव) याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले. त्यानंतर गुजरात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली.