लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणास अटक

सावदा : शहरात 21 वर्षीय तरुणीस लग्नाच्या आमिषाने बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी सावदा पोलिसात 25 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीस रविवारी, 20 रोजी रावेर न्यायालयात हजर केल्यावर त्यास 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सविस्तर असे, सावद्यातील 21 वर्षीय तरुणीची पहाटे रनिंगला जात असताना 25 वर्षीय तरुणाची ओळख झाली. त्यातून संबंध निर्माण झाल्यानंतर तरुणाने 29 मार्च 2021 आणि 10 एप्रिल 2021 रोजी लहान वाघोदा रस्त्यावरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. याबाबत 21 वर्षीय तरुणी शनिवार, 19 रोजी संशयित आरोपी योगेश नरसिंग पुर्भी (21, रा.संत रोहिदास नगर, सावदा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.डी. पवार करीत

आहे.

Copy