लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; पाच जण ठार

0

कनौज: उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे लखनऊ-आग्रा महामार्गावर आज रविवारी सकाळी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले आहे. १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधून ४० ते ५० जण या प्रवास करत होते. जखमींनी कन्नौज येथीलच वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती. कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही हबस धडकली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Copy