Private Advt

रोहिणी खडसे यांनी घेतली पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट

मुक्ताईनगर – महाराष्ट्राच्या (मुक्ताईनगर) हद्दी वर असलेल्या इच्छापुर येथे एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करून तिचे प्रेत विहरीत टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट  रोहिणी खडसे यांनी घेतली.

 

यावेळी पिडितेच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. याचं बरोबर या घटनेतील आरोपी लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.