रोलबॉल विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार

0

जळगाव – बांग्लादेशातील ढाका येथे संपन्न 4 था रोलबॉल विश्वचषक भारताने जिंकला. विजेत्या भारतीय संघातील खेळाडू योगेश तायडे व संजोग तापकीर यांचा सत्कार महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांचे हस्ते करण्यात आला. योगेश हा महावितरणमध्ये लेखा विभागात उच्चस्तर लिपिक पदावर कार्यरत दाम्पत्य विठ्ठल तायडे व संध्या तायडे यांचा मुलगा आहे.

यावेळी बोलताना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर म्हणाले की, शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकांने खेळ खेळणे आवश्यक आहे. खेळातील प्राविण्याच्या बळावर अपेक्षित यश जीवनात तुम्हाला साध्य करता येईल. सातत्य, कठोर परिश्रम व आत्मविश्वास हीच यशाची गुरूकिल्ली आहे. सर्वसामान्य कुटूंबातील योगेश व संजोग ने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेले हे यश सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांचे भावी कारकिर्दीस शुभेच्छा आहेत. याप्रसंगी जळगांव मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे, अधिक्षक अभियंता(पायाभुत आराखडा) अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री. नरेंद्र नारायणे, औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी केले.