रोमांचक सामन्यात श्रीलंकेची ऑस्ट्रेलियावर मात

0

मेलबर्न। श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी-20 सामन्यात पाच गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 168 धावांची मजल मारली होती.

श्रीलंकेने 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने कर्णधार उपुल थरंगाची विकेट पहिल्याच षटकात गमावली. पण त्यानंतर निरोशान डिकवेला (30) आणि दिल्शान मुनाविरा (44) यांनी दुसर्‍या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. असिका गुणरत्ने याने 37 चेंडूंत 7 चौकारांसह 52 धावांची निर्णायक खेळी केली. अठराव्या षटकात दोन चेंडूंच्या अंतराने श्रीलंकेने दोन गडी गमावले. पण कापुगेदरा आणि सीकुगे प्रसन्ना यांनी श्रीलंकेचा विजय साकार केला. त्यापूर्वी ऍरॉन फिंच (43), वयाच्या 38 व्या वर्षी पदार्पण करणारा मायकेल क्लिगंर (38), ट्राविस हेड (31) या आघाडीच्या तीन फलंदाजांच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाचे आव्हान उभे राहू शकले होते. दुखापतीनंतर पुनरागमन करणार्‍या लसित मलिंगाच्या गोलंदाजीचा श्रीलंकेला आधार मिळाला. त्याने 29 धावांत 2 गडी बाद केले.